Logo
Knowledge Resource Center/Library
काळे, व. पु.

इन्टिमेट Intimate - १st - पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१७. - 128 p. : 21 cm.

व. पु.काळे ह्यांचा कथातले जग हे आपल्या अवतीभोवतीचेच असते. किंबहुना त्यात कोठे ना कोठे आपण असतोच परंतु जे आपल्या लक्षात आलेले नसणे किंवा लक्ष जाऊनही कळलेले नसते ते वपुंनी मार्मिकपणे टिपलेले असते आणि त्यावर मिष्कीलपणे शब्द केलेले असते. त्यातून मत्सरी मंडळींचे "दिलासा मंडळ"' सारख्या अफलातून कल्पना वाचकांसमोर देतात न त्यातून असे अचूक लिहू शकणार्‍याबद्दलही मत्सर वाटू लागतो! संवादातून कथा फुलविणे ही तर वपुंची खासियतच. त्यामुळेच तर वपुंच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात- अश्याच वपुंच्या नऊ कथा ह्या संग्रहात आल्या आहेत. "मोदी अॅंड मोदी"' सारखी वाचकांनी उचलून धरलेली कथाही ह्यात आहे.


अभिनव कल्पनांच्या सहाय्यानं मानवी स्वभावाचं बहुरंगी दर्शन, ‘‘... प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत, ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय, ह्याचं एक ठसठसणारं दु:ख तो कायम जवळ बाळगून असतो; आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी, की हे कुठं बोलता येत नाही! त्यासाठी मी ‘दिलासा मंडळ’ स्थापन केलं. मनातली सगळी मळमळ त्यानं इथं ओकायची..... याचे वर्गणीदार वाढण्याचा सीझन म्हणजे साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं, साहित्य पुरस्कार जाहीर होतात, तो काळ..... इथं ढोंगी माणसाला प्रवेश नाही. निखळ मत्सरी माणसं हवीत....’’ माणसानं मनात दडवून ठेवलेल्या अशा बऱ्यावाईट स्वाभाविक भावना उदार अंत:करणानं समजून घेणं आणि आपल्या खास नर्ममुलायम, मिस्कील शैलीत त्या आविष्कृत करणं, हा श्रेष्ठ कथालेखक वपु काळे यांच्या कथालेखनाचा महत्त्वाचा विशेष. मुळात जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच प्रसन्न, आशावादी व उदार आहे; आणि अवघड विकारांचाही धीटपणे आविष्कार करण्याचं त्यांचं कसब तर वाचकाला विस्मयचकित करतं. ‘इन्टिमेट’मधील प्रत्येक कथा याच कारणानं मनाला भिडते. अभिनव कल्पनांच्या सहाय्यानं मानवी स्वभावाचं बहुरंगी दर्शन, ‘‘... प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत, ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय, ह्याचं एक ठसठसणारं दु:ख तो कायम जवळ बाळगून असतो; आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी, की हे कुठं बोलता येत नाही! त्यासाठी मी ‘दिलासा मंडळ’ स्थापन केलं. मनातली सगळी मळमळ त्यानं इथं ओकायची..... याचे वर्गणीदार वाढण्याचा सीझन म्हणजे साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं, साहित्य पुरस्कार जाहीर होतात, तो काळ..... इथं ढोंगी माणसाला प्रवेश नाही. निखळ मत्सरी माणसं हवीत....’’ माणसानं मनात दडवून ठेवलेल्या अशा बऱ्यावाईट स्वाभाविक भावना उदार अंत:करणानं समजून घेणं आणि आपल्या खास नर्ममुलायम, मिस्कील शैलीत त्या आविष्कृत करणं, हा श्रेष्ठ कथालेखक वपु काळे यांच्या कथालेखनाचा महत्त्वाचा विशेष. मुळात जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोनच प्रसन्न, आशावादी व उदार आहे; आणि अवघड विकारांचाही धीटपणे आविष्कार करण्याचं त्यांचं कसब तर वाचकाला विस्मयचकित करतं. ‘इन्टिमेट’मधील प्रत्येक कथा याच कारणानं मनाला भिडते. अभिनव कल्पनांच्या सहाय्यानं मानवी स्वभावाचं बहुरंगी दर्शन, ‘‘... प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत, ते दुसऱ्या कुणालातरी मिळतंय, ह्याचं एक ठसठसणारं दु:ख तो कायम जवळ बाळगून असतो; आणि त्याहीपेक्षा कुचंबणा अशी, की हे कुठं बोलता येत नाही! त्यासाठी मी ‘दिलासा मंडळ’ स्थापन केलं. मनातली सगळी मळमळ त्यानं इथं ओकायची..... याचे वर्गणीदार वाढण्याचा सीझन म्हणजे साहित्य संमेलनं, नाट्य संमेलनं, साहित्य पुरस्कार जाहीर होतात, तो काळ..... इथं ढोंगी माणसाला प्रवेश नाही. निखळ मत्सरी माणसं हवीत....’’ माणसानं मनात दडवून ठेवलेल्या अशा बऱ्यावाईट स्वाभाविक आशावादी व उदार आहे; आणि अवघड विकारांचाही धीटपणे आविष्कार करण्याचं त्यांचं कसब तर वाचकाला विस्मयचकित करतं. ‘इन्टिमेट’ मधील प्रत्येक कथा याच कारणानं मनाला भिडते.

9788177663198


Marathi Novel
Fiction

891.46371 / KAL
AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha