TY - BOOK AU - साने,पांडुरंग सदाशिव TI - सुंदर पत्रे SN - 9789386273581 KW - Marathi Novel N1 - पळसाच्या फुलांचा रंग अर्जुनाने घेतला. क्षणभर तो सावध नव्हता. पळसाच्या फुलाचा कुसुंबी रंग होता. मी हे वैभव बघत जात होतो. ऊन पडले होते. रानात सोडलेले गाईगुरे - त्यांना चरायला काय होते? तरी ती जमिनीला तोंड लावीत. वाळलेली तृणाची काडी कोठे मिळेल ही इच्छा. ती पाहा, एक गाय विहिरीवर उभी आहे. उन्हाळ्याचे दिवस, पाण्याचा दुष्काळ. काठेवाड्यात एका कुटुंबाला एक गॅलन पाणी रोज देण्यात येते. कसे करीत असतील लोक! काठेवाड्यात मोठी नदी नाही. जैनांनी मोठी मंदिरे बांधली. परंतु पाणी मिळेल अशी का नाही योजना? काही जुने प्रचंड तलाव आहेत; परंतु नाना संस्थाने. एकमेकांच्या हद्दी आड येत. त्यामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुष्काळ आले की एका थेंबासाठी जीव हपापे UR - http://saneguruji.net/sane/index.php?option=com_content&view=section&layout=blog&id=433&Itemid=623&limitstart=51 ER -