भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास : भारतीय समाजशास्त्र : समस्या आणि आव्हाने
- १st ed.
- Los Anjelis: Sage bhasha publication, 2017.
- 312 p. : 25 cm
संपूर्ण भारताला एक समाज म्हणून विचारात घेण्याची पारपंरिक वृत्ती आणि भारताकडे एक राष्ट्र-राज्य म्हणून पाहण्याचा नैसर्गिक कल याविषयीची तपासणी भारतीय समाजशास्त्रज्ञांमार्फत होऊ लागली आहे.‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ हा बहुप्रबंधक खंड या परिणामांचाच एक भाग ठरतो.
‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ या खंडात आलेले निबंध हे एकेकट्याने किंवा सामूहिक स्वरूपात भारतीय समाजाच्या व समाजशास्त्र अभ्यासाच्या एक किंवा अनेक पैलूंचे विश्लेषण करतात. त्या दृष्टीने हा खंड म्हणजे खरोखरीच भारतीय समाजशास्त्राविषयीचा शोधकदीप ठरतो. तसेच, भारतीय समाजशास्त्रज्ञांना आत्मनिरीक्षणासाठी प्रवृत्त करतो. भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (आयएसएस) अधिकृत मुखपत्रातून प्रस्तुत निबंधांची काळजीपूर्वक निवड प्रा. एल. थारा भाई यांनी केली आहे. समाजशास्त्र प्रगल्भ झाल्यानंतर आणि भारतात लोकप्रिय झाल्यानंतर विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा अशा विविध स्तरांवर या विद्याशाखेचा विस्तार झाला. इतर विद्याशाखांनाही समाजशास्त्राची दखल घ्यावी लागते.
दुसरीकडे, आधुनिकतेची तीव्र लाट आणि जागतिकीकरणाचा रेटा यांनी या विद्याशाखेसमोर नवे आव्हान उभे केले. त्यांची दखल आधुनिक समाजशास्त्रानेही घेतलेली दिसून येत आहे.
This volume includes 15 articles and highlights the challenges faced by the present-day sociologists in the context of development and growth of knowledge in other sectors. The selected articles discuss the growth of the sociology discipline over the past 75 years so that one can get a cross-section of the thinking of sociologists towards the growth, issues, and challenges faced from time to time.
CONTENTS परिचय थारा भाई स्वतंत्र भारतातील समाजशास्त्र डी. पी. मुखर्जी भारतातील विकास आणि नियोजनाचे समाजशास्त्र आर. एन. सक्सेना भारतीय समाजशास्त्र: ऐतिहासिक विकास आणि सध्याच्या समस्या रामकृष्ण मुखर्जी भारतातील सामाजिक शास्त्रांची भूमिका: ज्ञानाचे समाजशास्त्र योगेंद्र सिंह भारतीय परंपरेचे समाजशास्त्र आणि भारतीय समाजशास्त्राची परंपरा कृष्णप्रकाश गुप्ता भारतातील समाजशास्त्राचे अध्यापन आणि संशोधन सी. लक्ष्मण भारतातील सामाजिक शास्त्र संशोधनावरील विचार पी. सी. जोशी भारतीय समाजशास्त्र: यथार्थ स्वत्वाचा शोध ए. आर. मोमीन भारतीय समाजशास्त्र आणि भारतातील समाजशास्त्र: त्यांच्या अस्तित्वाविषयीचे चिंतन जयंत के. लेले भारतातील समाजशास्त्र: संदर्भीकरणासाठी आवाहन टी. के. उम्मेन भारतातील समाजशास्त्र आणि त्याचे भवितव्य एम. एन. श्रीनिवास भारताच्या स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतर: शास्त्रीय समाजशास्त्रापुढची आव्हाने व्हिक्टर एस. डिसूझा संकटग्रस्त भारतीय समाजशास्त्र: प्रादेशिक अभिमुखतेची आवश्यकता हेतुकर झा तंत्रज्ञान संस्थांमधील मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रांचा शोध रविंदर कौर समाजशास्त्र आणि चालू घडामोडी