आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा
- 1st ed.
- Los Anjelis : Sage Publishers, 2018
- 136 p. : 25 cm
आपला पीएचडी प्रबंध कसा प्रकाशित करावा हे पुस्तक विद्यार्थ्यांना त्यांचे संशोधन प्रकाशित करण्यासाठी आवश्यक असे पहिले समग्र आणि खात्रीशीर मार्गदर्शक पुस्तक आहे. मानव्यविद्या आणि सामाजिक शास्त्रांच्या विशाल आवाक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या शिक्षक-मार्गदर्शकांसाठी हे पुस्तक नक्कीच उपयुक्त ठरेल. अनेक बाबतींमध्ये हे पुस्तक व्यावहारिक माहितीचे आणि मार्गदर्शनाचे भांडार ठरते. उदा. प्रकाशकाची निवड, प्रबंधात सुधारणा, प्रस्तावाची मांडणी करणे, परीक्षणास तोंड देणे, कराराची बोलणी करणे, प्रकाशनाच्या विपणन विभागाबरोबर काम करणे आदि महत्त्वाच्या बाबींची माहिती विद्यार्थ्यांना असतेच, असे नाही.
या पुस्तकाची प्रत प्रत्येक पीएचडी इच्छुकाने डॉक्टरेटची नोंदणी करण्यापूर्वी खरेदी केली पाहिजे, नंतर नव्हे! तरुण संशोधकांना ज्याचे सर्वाधिक दडपण येते अशा प्रक्रियांसंबंधी अत्यंत उपयुक्त ठरेल असे व्यावहारिक मार्गदर्शनपर लेखन सारा कारो यांनी केले आहे. त्यांच्या नर्मविनोदी शैलीच्या मांडणीमुळे अडचणी, समस्यांवर मात करणे या संशोधकांना सोपे जाते.
How to Publish Your PhD is the first book to provide students with a comprehensive and authoritative guide to publishing their research.
A wealth of practical information and advice is included on:
choosing a publisher revising your thesis putting together a proposal surviving the review process negotiating a contract working with your publisher’s marketing department. It will be an invaluable resource for students across the broadest range of the humanities and social sciences and for all those teaching and advising them.
CONTENTS प्रास्ताविक शैक्षणिक प्रकाशनाची सदा बदलती दुनिया पुस्तके की लेख? तुमच्या पीएचडीची सुधारित आवृत्ती बनविणे प्रकाशक निवडताना प्रस्ताव बनविणे आणि सादर करणे परीक्षणामधून तरून जाताना कराराबाबत वाटाघाटी करताना तुमचे आणि तुमच्या पुस्तकाचे विपणन करताना अधिक वाचनासाठी