@book{7587,
	author = {व्हिएरा, वाल्टर },
	title = {दि विनिंग मॅनेजर:},
	publisher = {SAGE Publications India Pvt. Ltd.,},
	year = {2018.},
	address = {Los Angelis:},
	edition = {1st ed.},
	note = {व्यवस्थापन क्षेत्रात नोकरी करून स्वतःच्या पायांवर स्थिरावण्याची मनिषा बाळगणाऱ्यांना वॉल्टर व्हिएरा यांचे ‘दि विनिंग मॅनेजर’ हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरू शकेल. एक चांगला/चांगली मॅनेजर बनण्यासाठी कोणती मूल्ये आत्मसात करावी लागतात, कोणत्या बाबी शिकून घ्याव्या लागतात, कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात आणि त्यांचा फायदा घ्यायचा असतो, याविषयीचे समग्र आणि रोचक आकलन आपल्याला या पुस्तकातून नक्कीच होऊ शकते. व्यवस्थापनामध्ये यशस्वी व्हायचे असेल, तर वॉल्टरना तुमचा मार्गदर्शक बनवा असे विख्यात मॅनेजमेंट गुरू फिलिप कोटलर यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलंय. ते योग्यच आहे.

व्यवस्थापन शास्त्राच्या निव्वळ सिद्धान्तापलीकडे जाऊन हे पुस्तक कॉर्पोरेट जगतातील प्रत्यक्ष घडामोडींचा, स्थितींचा धांडोळा घेते. नोकरीसाठी अर्ज करण्यापासून ते मध्यम-स्तर व्यवस्थापनापर्यंतचा काळ यात अंतर्भूत आहे. वॉल्टर व्हिएरा यांचा ५० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव चटपटीत आणि सोप्या भाषेत आपल्यासमोर येतो आणि सिद्धान्तापलीकडे जाऊन ‘काय करायला हवे’ याविषयी सुयोग्य मार्गदर्शन करतो.}
}
