TY - BOOK AU - पाटील, शंकर. TI - इल्लम SN - 9788177668520 U1 - 894.46 23rd ed. PY - 2018/// CY - Pune PB - Mehata publishing house KW - Marathi Novel N1 - संपतरावांच्या डोक्यात एक गोष्ट गच्च बसली. अगदी सिमेंट क्राँकिट ! संपतराव रोज आपलंच डोकं खात बसला. पंधरा लाख देऊनही नाव होत नाही म्हणजे काय ? काहीतरी इल्लम सापडलं पाहिजे... असं काय करावं ? काय काढावं ? काहीतरी चकित करणारं सापडलं पाहिजे... सगळ्या पेपरात बातमी आली पाहिजे. सगळ्यांच्या तोंडी आपलाच विषय निघाला पाहिजे. नावाचा डंका गाजला पाहिजे ! नाव गाजत नाही, तर मग एवढा पैसा मिळवून तरी काय फायदा ? एवढे नोकरचाकर, गडीमाणसं राबतात, एकाला दोन बंगले, गडगंज इस्टेट, सोन्याचांदीची भांडी, दागदागिने, काश्मिरी कार्पेटस् सा-या जगातून आणलेल्या शोभेच्या सुंदर सुंदर वस्तू... कोणत्या गोष्टीची ददात आहे ? एवढं ऐश्वर्य पायाशी लोळणं घेतंय, पण त्याचा उपयोग काय? नाव नाही... एका रात्रीत नाव व्हावं, पेपरात सगळीकडं छापून यावं, असं काहीतरी इल्लम काढलं पाहिजे. आणि एक दिवस संपतरावांनी इल्लम काढलं ! ER -