Logo
Knowledge Resource Center/Library

Your search returned 42 results.

Not what you expected? Check for suggestions
21. BOOKS
प्रतीक्षा by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 104 p. : , लहानपणापासूनच आई-वडिलांच्या मायेला पारखा झालेला, पोरका मिलिंद प्रेमाच्या, मनःशांतीच्या ओलाव्याचा शोध घेत प्रवासी म्हणून निसर्गाच्या अंगा-खांद्यावर भटकत जंगलानं वेढलेल्या राधेकृष्ण मंदिराच्या आसऱ्याला क्षणिक विसाव्यासाठी येतो. तिथं त्याला ऋषितुल्य बाबा, त्यांच्या मुलीसारखी असणारी, त्यांच्यासोबत राहून मंदिरात सेवा देणारी नंदिनी व तिचा ७-८ वर्षांचा मुलगा भेटतात. विसाव्याच्या काही क्षणांसाठी आलेला मिलिंद या तिघांच्या सहवासात चार-सहा दिवस घालवतो. नंदिनीही आपल्या आयुष्यात जवळच्या माणसांना पारखी झालेली असते. आपल्या मुलाची जबाबदारी तिच्यावर असते. बाबांच्या प्रेमळ संरक्षक कवचात ती क्वचित येणाऱ्या वाटसरूंचीही बाबांबरोबर सेवा करत असते. तिच्या सात्त्विक, सुंदर व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण मिलिंदला भुरळ पाडतं. तशात बाबा परिसरातील गावकऱ्यावर निसर्गातील जडीबुटींचे वैद्यकीय उपचार करण्यासाठी मदत करत असल्यानं, २-३ दिवस मिलिंदकडे नंदिनी-राहुलला सोपवून जातात; पण आधीच दुःखानं पोळलेली नंदिनी त्याला प्रतिसाद देण्यास घाबरते. पुन्हा एकदा वैवाहिक आयुष्याचा डाव मांडावा की नाही, याबद्दल तिची द्विधा अवस्था होते. अखेर मिलिंद तिची मनोवस्था जाणून, आपल्या पुढच्या वाटचालीकरता एकटाच निघण्याची तयारी करतो. ...पण बाबा येईपर्यंत त्याला थांबावे लागते. काय होते बाबा परत आल्यावर? बाबा त्या दोघांच्या मनाची उलघाल ओळखतात आणि सांगतात- ‘‘परिचय अल्प आणि दीर्घ नसतोच मुळी! दोन मनांची पुरी ओळख जिथं होते, तिथं मी एकमेकांकडे आकर्षिली जातातच मुळी! ही शक्ती अफाट सामर्थ्यदायी आहे. नदी सागराला मिळते, ती कोणत्या परिचयानं? वीस वर्षांपूर्वी मी इथं फिरत फिरत आलो. या मूर्तीपेक्षा अनेक सुंदर मूर्ती, अनेक सुंदर जागा मी पाहिल्या; पण तिथं माझं मन रमलं नाही. ही मूर्ती पाहिली आणि मी जिंकलो गेलो. हे का घडलं?`` अखेर बाबांच्या आशीर्वादानं दोघांची एकत्र वाटचाल सुरू होते. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

22. BOOKS
इन्टिमेट by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 128 p. : , व. पु.काळे ह्यांचा कथातले जग हे आपल्या अवतीभोवतीचेच असते. किंबहुना त्यात कोठे ना कोठे आपण असतोच परंतु जे आपल्या लक्षात आलेले नसणे किंवा लक्ष जाऊनही कळलेले नसते ते वपुंनी मार्मिकपणे टिपलेले असते आणि त्यावर मिष्कीलपणे शब्द केलेले असते. त्यातून मत्सरी मंडळींचे "दिलासा मंडळ"' सारख्या अफलातून कल्पना वाचकांसमोर देतात न त्यातून असे अचूक लिहू शकणार्‍याबद्दलही मत्सर वाटू लागतो! संवादातून कथा फुलविणे ही तर वपुंची खासियतच. त्यामुळेच तर वपुंच्या कथा पुन्हा पुन्हा वाचाव्याश्या वाटतात- अश्याच वपुंच्या नऊ कथा ह्या संग्रहात आल्या आहेत. "मोदी अॅंड मोदी"' सारखी वाचकांनी उचलून धरलेली कथाही ह्यात आहे. 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

23. BOOKS
कर्मचारी by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 172 p. : , "तुम्ही दुधाच्या, रेशनच्या, साखरेच्या, तिकिटांच्या, बसच्या रांगेत तासन् तास उभे राहता. चालती गाडी पकडता. लोकलला लोंबकळता. लेटमार्क चुकवण्यासाठी जीव गहाण टाकता. साहेबाची बोलणी खाता. कँटिनचा बेचव चहा पिता. संसारात तर नाना आपत्ती सहन करता. आज हे नाही. उद्या ते नाही. मोर्चा, हरताळ, संचारबंदी, उपोषण सगळं हलाहल पचवता. तरीही तुम्ही हसता. हसवता. गाडीत उभ्या उभ्या पत्ते खेळता. राजकारणावर हिरिरीने बोलता. एखाद्याला मोरु बनवून आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करता. बेचव चहाच्या पैजेवरही खुष होता. यू आर सिम्पली ग्रेट! असे तुम्ही जातिवंत कर्मचारी हा कथासंग्रह म्हणायचा. नाही, पण ते काही खरं नाही. हा आहे आरसा. सर्वांना प्रेम करायला लावणारा आरसा. उद्या रिटायर्ड होणारा हेडक्लार्क पण लिफ्ट मजल्यावर जाता जाता तिथल्या आरश्यात डोकवतो,तसाच हा आरसा. 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

24. BOOKS
वपूर्वाई by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 134 p. : , ‘‘....महाकाय वटवृक्ष तोडून त्याच्या लाकडाचे पैसे नक्कीच भरपूर येतील; पण त्याच्या कितीतरी पट अधिक, पिढ्या न् पिढ्या पुरणारी संपत्ती त्याची सावली असते. मला सावलीचं महत्त्व पटतं....’’ — लोकप्रिय कथाकार वपु काळे आपल्या कथेत अशा अनोख्या प्रतिमांमधून सतत माणूसपणाचा उद्घोष करताना दिसतात. वेगवेगळ्या परिस्थितीत सापडलेली, संघर्ष करणारी, हसणारी, रडणारी, कुढणारी सर्वसामान्य माणसं रंगवताना, ते त्यांच्यातल्या असामान्यत्वाचा नेमका वेध घेतात आणि आपल्या प्रसन्न, खुमासदार, मिस्किल शैलीत त्याचा आविष्कार करतात. वपुंच्या लेखनातील हा पैलूच वाचकांना अपूर्वाईचा वाटतो. यामुळेच वपुर्वाई वाचकांचं मन सहज जिंकून घेते... 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

25. BOOKS
पावनखिंड by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 164 p. : , हेलकावे घेणाया पालखीचा गोंडा धरून राजे पालखीत बसले होते. पालखीवर झाकलेल्या अलवानामुळे राजांना काही दिसत नव्हतं. फक्त बाजींचा आवाज कानावर येत होता, ‘‘चला’’ चला! कुठं जायचं? एका माणसाच्या जिवासाठी धावायचं कुठवर? बाजी! कशासाठी हे कष्ट घेता? कोणाच्या स्वार्थापायी? आणि तेही एका माणसाच्या जिवापायी? कोणाच्या सत्तेनं आम्ही या माणसांना गुंतवलं? कोणत्या अधिकारानं? जीवनात अखेरचं मोल असतं ते स्वत:च्या जीवाचं! मग त्या जीवाच्या कवड्या यांनी आम्ही मांडलेल्या पटावर का उधळाव्यात? कसल्या आणि कुणाच्या भरवशावर? बाजी, फुलाजी तुम्ही स्वामीकार्यासाठी का ह्या अवघड वाटचालीत सामील झालात? कोणत्या त्यागापायी? हे व्हावं ही तो श्रींची इच्छा आहे असं आम्ही म्हणालो. पण हा महाचंडिकेचा होम धडाडत असता त्याचं पौरोहित्य आमच्या हाती का सुपुर्द केलंत? यातून खरं काही साधणार आहे का? या पालखीचा वीट येतो! नशिबानं या संकटातून पार पडलोच तर... बाजी, पालखीचा मान तुम्हाला देऊ! त्यावेळी तुम्हाला कळेल ही पालखी केवढं सुख देते ते! 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

26. BOOKS
पार्टनर by काळे, व. पु. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, २०१८ . 152 p. : , "पोरगी म्हणजे एक झुळुक. अंगावरून जाते, अमाप सुख देऊन जाते. पण धरून ठेवता येत नाही." "आपल्याला हवा तेव्हा तिसरा माणूस न जाणं हा नरक." "तुला मी हाक कशी मारू? पार्टनर ह्या नावानं. आपल्याला खरं तर नावच नसतं. बारशाला नाव ठवतात ते देहाचं." "कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं." "दु:ख, आनंद, जय-पराजय, हसू-आसू, जन्म-मरण, विरह-मिलन सगळं तसंच असतं. प्रत्येक क्षणी माणसाचं मन नवा जन्म घेतं. एवढचं काय ते नवीन. पुन्हापुन्हा जन्म घेण्याची ही क्रिया थांबणं हे मरण." 21 cm Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

27. BOOKS
निमित्त by काळे, व. पु. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, . 140 p. : , आजचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक वपु. काळे यांच्या लेखनाचा हा एक आगळावेगळा संग्रह. लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वतःला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांतील काही कथारूप घेतात, काहींच्या कादंबया होतात, काहींच्या कविता, तर काही नाट्यरूपानं सामोरे ठाकतात. काही अनुभव मात्र असे असतात, की त्यांना असलं काही रूप घेता येत नाही. मग काही ‘निमित्ता’नं त्यांना वाचा फुटते आणि ते स्वतःचाच एक स्वतंत्र; परंतु ललित आकार घेतात. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ आहे : ‘निमित्त.’ रूढार्थानं असो, नसो; वपु. काळ्यांची स्वतःची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे ललितबंधच आहेत.आजचे सर्वाधिक लोकप्रिय मराठी लेखक वपु. काळे यांच्या लेखनाचा हा एक आगळावेगळा संग्रह. लेखकाच्या मनोविश्वात अनंत अनुभव खदखदत असतात. स्वतःला शब्दरूप घेण्यासाठी आसुसलेले असतात. त्यांतील काही कथारूप घेतात, काहींच्या कादंबया होतात, काहींच्या कविता, तर काही नाट्यरूपानं सामोरे ठाकतात. काही अनुभव मात्र असे असतात, की त्यांना असलं काही रूप घेता येत नाही. मग काही ‘निमित्ता’नं त्यांना वाचा फुटते आणि ते स्वतःचाच एक स्वतंत्र; परंतु ललित आकार घेतात. अशा अनुभवांचा हा एक गुच्छ आहे : ‘निमित्त.’ रूढार्थानं असो, नसो; वपु. काळ्यांची स्वतःची ठसठशीत नाममुद्रा उमटलेले हे ललितबंधच आहेत. 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

28. BOOKS
अमृतवेल by खांडेकर, वि. स. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, . 160 p.: , ‘... या चित्रातल्या वेलीवर नाना रंगांची फुलं उमलली आहेत. प्रीतीही या वेलीसारखीच आहे, बाळ. प्रीती म्हणजे केवळ यौवनाच्या प्रेरणेतून उद्भवणारी वासना नव्हे! त्या वासनेची किंमत मी कमी मानत नाही. साया संसाराचा आधार आहे ती! पण या वासनेला जेव्हा खोल भावनेची जोड मिळते, तेव्हाच प्रीती ही अमृतवेल होते. मग या वेलीवर करूणा उमटते, मैत्री फुलते. मनुष्य जेव्हाजेव्हा आत्मप्रेमाचे कवच फोडून बाहेरच्या विश्वाशी एकरूप होतो, तेव्हा – प्रीतीचा खरा अर्थ त्याला जाणवतो. या बाहेरच्या विश्वात रौद्ररम्य निसर्ग आहे, सुष्टदुष्ट माणसं आहेत, साहित्यापासून संगीतापर्यंतच्या कला आहेत, आणि महारोग्याच्या सेवेपासून विज्ञानातल्या संशोधनापर्यंतची आत्म्याची तीर्थक्षेत्रं आहेत. ‘पण हीच प्रीती नुसती आत्मकेंद्रित झाली, आत्मपूजेशिवाय तिला दुसरं काही सुचेनासं झालं, म्हणजे मनुष्य केवळ इतरांचा शत्रू होत नाही; तो स्वत:चाही वैरी बनतो! मग या वेलीवर विषारी फुलांचे झुबके लटकू लागतात...’ 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.46371 KHA] (2),

29. BOOKS
बाज़ार by माडगूळकर, व्यं. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस ; . 108 p. : , पावसाची सर आली. उंटाचे अंग भिजू लागले. निळू म्हणाला, चला, पळा! ह्याला निवार्‍याला ठेवले पाहिजे. आम्हाला कुणाच्याही घरात उंटाला ठेवायचे होते, पण वाडीतील सगळी घरे बुटकी होती. माझ्या घरात उंट मावत नव्हता. निळूच्या घरात मावत नव्हाता. देवळात मावत नव्हता उंटाला कुठेच निवारा नव्हता. मेंढरांना, शेरडांना, कोंबड्यांना, कुत्र्यांना आडोसा होता. माणसांना आडोसा होता, पण उंटाला नव्हता. कारण तो सर्वात जास्त मोठा, उंच होता. अचानक बाहेरुन परका आलेला होता. पावसाची भुरभुर थांबली. संध्याकाळ झाली. मग एकाएकी उंटाने पुढच्या पायाचे गुडघे मोडले. त्याचा भलामोठा देह खाली आला. मान लांब करुन त्याने भुईवर टाकली. उंटाने टक लावून आमच्याकडे बघितले आणि डोळे मिटले ... 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 MAD] (1),

30. BOOKS
चिअर्स by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस ; . 138 p. : , ‘चिअर्स’ फक्त पेल्याला पेला भिडल्यावर होत नाही. वपुंचं ‘चिअर्स’ हृदयाला भिडलेलं हृदय आणि त्यातून उमलणारी आनंदधून अधोरेखित करतं. ज्यांच्या सहवासात आयुष्य बहरुन जावं, अशी वपुंच्या आयुष्यातील विलक्षण माणसं या पुस्तकात भेटतात. एखादे अण्णा वपुंना सांगतात, ‘जुनं काहीही सोडायचं नाही, जुनं सगळं करता करताच नवं सापडेल.. वयाच्या तिसऱ्या वर्षी आपण श्री गिरवतो. ती श्री इतिश्री होईतो राहतेच.’ तर भाऊसाहेबांसारखा उमदा माणूस आत्मविश्वासाचं खोल बीज रुजवतो. असे अनेक पेले इथे भेटतात. रिते होत नाहीत तर रसिकांच्या मनोवृत्तीला चिअर्स करतात. आयुष्य असंही जगता येतं हे सांगून जातात. व्यक्तिपरिचय हा मनाला उभारी देणारा असावा, उत्तेजन देणारा असावा आणि त्यासाठी अशा व्यक्तींचा सहवास मिळावा. वपुंना सहवास मिळाला आणि म्हणून ते त्या व्यक्तींना वाचू शकले. चिअर्स म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवू शकले. नशा आहे पण धुंदी नाही. मद्य आहे पण ग्लानी नाही. पेले आहेत पण रितेपण नाही. रंग आहेत जे बेरंगी करत नाहीत. चिअर्स ! 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

31. BOOKS
झोपाळा by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 122 p. : , मनाच्या विविध रंगछटांचं दर्शन म्हणजे हा कथासंग्रह मनाच्या विविध रंगछटांचं दर्शन वपुंच्या या पुस्तकातून घडतं यातल्या प्रत्येक कथेतला वेदनेचा अंत:स्त्रोत वाचकांना वेढून टाकतो. या वेदनेसह जगणार्या मनस्वी व्यक्तींच्या मनस्वी कथा आपल्याला अंतर्मुख करतात. स्वत:चा शोध घ्यायला भाग पाडतात. या कथांमधील माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

32. BOOKS
हुंकार by काळे, व. पु. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, . 160 p. : , ‘हुंकार’ हा कथासंग्रह म्हणजे तारुण्यातील बेरीजवजाबाकीचा आलेखच! तारुण्य आयुष्यातील सळसळत्या उत्साहाचा काळ. प्रेम करण्याचा, प्रेमात हरवण्याचा, प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याचा. स्वत:ची झालेली फट्फजिती कबूल करण्याचा, दुसयाची गंमत मजेत दुरून बघण्याचा, पण कधीकधी भलतीच ठेच लागते, अगदी जिव्हारी लागते. विसरू म्हणता विसरता येत नाही. नकळत झालेली चूक स्वीकारताही येत नाही. वास्तवाला सामोरे जायचे धैर्यही कधीकधी दाखवावे लागते. संसारात पडल्यावर दुखरा कोपरा मनात ठेवून काहीजण जगतात, काही त्यातून बाहेर येतच नाहीत. मागचे भोग विसरून वाटेला आलेला संसार टुकीने, नेटकेपणाने करणारे असतात. तर व्यवहारात भलत्याच काळ्या वाटेने जाऊन काहीजण फसवे सुख मिळवतात. प्रेमाच्या निरनिराळ्या छटा, त्यातील आततायीपणा, जोम, परिस्थितीमुळे असफल झालेल्या प्रेमातील वेदना, कारुण्य, संसारातले वास्तव, तडजोड, सच्चेपणा, मुलांबद्दलचा उमाळा, हळवेपणा या सा-या अवस्था वपुंनी या संग्रहातील वेगवेगळ्या कथांमधून चितारल्या आहेत. कधी विनोदाने मनाला खुदकन हसवणाया, कधी डोळ्यांच्या कडा ओल्या करणाया, तर कधी सरळ सत्याला भिडणाया अशा या कथा आहेत. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

33. BOOKS
माणसं by काळे, व. पु. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, . 224 p. : , हे एकप्रकारचे माणसाचे विश्वरूपदर्शनच ! नेमके काय घडलेय - बिघडलेय दाखवणारे व. पु. काळे "माणूस"प्रेमी लेखक. त्यांनी गणितापेक्षा कवितेस अधिक जवळचे मानले. त्यामुळे विविध माणसेही त्यांच्या अधिक जवळ गेलीत. ते अधिक माणसांच्या जवळ गेले त्यामुळे माणसांचे एक चैतन्यदायी विलोभनीय कारंजेच त्यांना पहायला मिळाले. त्यातूनच त्यांच्या अनेक कथांचा लाभ झाला कथाकथनाचे कार्यक्रम रंगले. ह्या पुस्तकातील "माणसं" म्हणजे त्या त्या माणसांच्या पूर्ण कथा नसल्या तरी ही माणसे उलगडतीलच असे हे तुकडे आहेत. ह्यात वपुंनी ऐकलेल्या-वाचलेल्या पासून त्यांनी अनुभवलेल्या, मनीमानसी नोंदवलेल्या पर्यंतच्या अशा अनेक घटना आहेत की ज्याने वाचकाला वाचनानंदाबरोबरच आणखीही काही मिळाले. हे सारे बहिणाबाई अभिप्रेत "माणसा माणसा कधी व्हशीन माणूस" साठीच आहे. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

34. BOOKS
दोस्त by काळे, व. पु. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 176 p. : , दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे.दोस्त यामध्ये विविध प्रकारच्या माणसांच्या कथा आहेत. स्वत:चा, स्वत:च्या कुटुंबीयांचा स्वाभिमान जपणारी, कोत्या स्वभावाची, हट्टी, बेडकासारखे विशिष्ट आखलेले जग असणारी, परिस्थितीवर मात करणारी, तिला शरण जाणारी, चाकोरीबद्ध जीवनाविरुद्ध कंटाळून बंड करणारी... अशी ही माणसे आहेत. या माणसांचे स्वभाव, त्यांची सुखदु:खे, त्यांच्या समस्या, त्यांची स्वप्ने ही आपल्या आजूबाजूलाच आढळणारी आहेत. त्यांच्या आयुष्यात घडणारे प्रसंग आपल्या आयुष्यात कधीतरी घडलेले असतात किंवा इतरांच्या आयुष्यात त्याचे प्रतिबिंब बघितलेले असते आणि म्हणून ती माणसे आपली वाटतात. छोट्याशा कथाबीजाचे फुलवत फुलवत भावस्पर्शी कथेत रूपांतर करण्याचे वपुंचे कसब व सामथ्र्य, साध्या सोप्या संवादातून जीवनाचे एखादे तत्त्वज्ञान सांगण्याची त्यांची हातोटी, जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला वेगळेच बळ देतो. कथासंग्रहाला ज्या कथेचे नाव दिले आहे; त्या कथेत या सर्वांचा परमोच्च बिंदू गाठला गेला आहे. 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 KAL] (1),

35. BOOKS
अभोगी by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस २०१८ . 208 p. : , घराणं आणि आविष्कार जन्मतो गायकाच्या गळ्यातून! महत्त्वाचा असतो, तो सूर! आवाज! आणि त्या कलावंतांची फेक! एकाच घराण्याच्या दहा गायकांची गाणी ऐकली, तर नव्या माणसाला ते घराणं कळेल का? काहीतरी गोंधळ होतो. काही समजत नाही. सुरानं बद्ध झालेली. तीन सप्तकांच्या पलीकडे जाता येत नाही. वाटतं! त्या पलीकडे जावं. नवे सूर, नवे अंदाज गाठावेत. नवे राग जन्माला यावेत. पाठीमागच्या लोकांनी घोटण्यासाठी नव्हे. त्यांनी तसंच काहीतरी निर्माण करावं, म्हणून! ते नवं शोधायला नवे पंख हवेत. सुरवंट आपला कोश बांधतं. आणि नंतर त्यातून फुलपाखरू जन्मतं. या फुलपाखराचा जन्म कलावंताला लाभत नसला, तर त्या कलावंताच्या जीवनाला अर्थ काय? सगळं सुख भोगायला असूनही ‘अभोगी’ राहिलेल्या कलावंताची रणजित देसार्इंनी रेखाटलेली भावपूर्ण कथा. 21 cm Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

36. BOOKS
राधेय by देसाई, रणजित. Publication: पुणे : मेहता पब्लिशिंग हाऊस, . 280 p. : , मी योद्धा आहे. जखमाची क्षिती बाळगून भागायचं नाही. जन्माबरोबरच सुरु झालेलं हे युद्ध अखेरच्या क्षणापर्यंत मला चालवलं पाहिजे. त्यातच माझ्या जीवनाचं यज्ञ सामावलं आहे. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 152 [891.46371 DES] (1), AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 Cupboard 31 Shelf 152 [891.46371 DES] (1),

37. BOOKS
वैशाख by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 128 p. : , रणजित देसाई हे एक बहुआयामी साहित्यिक आहेत. त्यांच्या सुरुवातीच्या काळातील हा संग्रह. ग्रामीण जीवनाचा वेध घेणाया कथांमध्ये माणसांतला कोरडेपणा वैशाखाच्या उन्हाप्रमाणेच मनाला चटका देऊन जातो. लालित्यपूर्ण शैलीतल्या या कथा वाचून आणि अनुभवून रणजित देसाई हे आपल्या काळातील एक थोर साहित्यिक आहेत याचा उत्कट प्रत्यय वाचकांना येईल. 21 cm. Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 General Stacks [891.46371 DES] (1),

38. BOOKS
ओलावा by साठ्ये, श्रीराम विष्णू Publication: Los Anjelis : SAGE Publications India Pvt. Ltd., 2015 . 79 p. : , ओवा हे पुस्तक लिहिताना यातील सर्वच गोष्टी निसर्गाची विविधता, सौंदर्य, उदारता हि झाडे, फुले, पाने, वृक्षवेली यांच्या माध्यमातून माणूस आणि निसर्ग यांच्यात कुठेतरी प्रेमाचा धागा सामायिक आहे व त्या धाग्यात सर्व सृष्टी गुंफलेली आहे असे मनाला भासत राहिले. मानवाप्रमाणे पण-फुलांना, वृक्षवेलींना भावना असल्यासच पाहिजेत परंतु त्यांना त्या व्यक्त करता येत नसाव्यात किंवा त्या भावना आपणास समजून घेत नसाव्यात असे वाटते. अशा नाजूक व पर्यावरणासंबंधित व त्यांची जाणीव करून देणाऱ्या घटना या पुस्तकात आहेत. हि जाणीव असणारी अशी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. त्या जाणिवेपोटी त्या व्यक्तीने अशी काही मदत केली कि ती मदत आज मला माझी आवश्यकता होऊन राहिली आहे. 21 cm Date: 2015 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

39. BOOKS
आलेख by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 196 p. : , ‘आलेख’ हा रणजित देसार्इंचा ग्रामीण जीवनावर आधारित कथांचा संग्रह. गाव वरवर जरी शांत वाटले तरी अंतरंगात कितीतरी घडामोडी चाललेल्या असतात. गावची चावडी, पार, हिरवेगार मळे, चिरेबंदी वाडे, गरिबाची झोपडी, डोंगरमाथे, करवंदांच्या जाळ्या ही घटनांची केंद्रस्थळं. गावातली तहेवाईक, इरसाल, बेरकी, गरिबीने गांजलेली, देवभोळी, अंधश्रद्धाळू माणसं! निसर्ग आणि जनावरं यांच्याशिवाय त्यांच्या जीवनाला पूर्णत्व येतच नाही. ही माणसं त्यांच्या ईर्षा, त्यांचा बाणेदारपणा, यातना, मुलांवरची माया, शहरवासीयांशी त्यांचे येणारे संबंध, सर्व सच्चेपणाने जगतात, निभावतात. निसर्ग आणि जनावरांशी एकरूप झालेली ही माणसं त्यांच्या रंगरेषांसह देसाई यांनी आपल्या लेखणीतून तितक्याच सच्चेपणाने चितारलेली आहेत. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.46371 DES] (1),

40. BOOKS
बारी by देसाई, रणजित. Publication: पुणे: मेहता पब्लिशिंग हाऊस, . 192 p. : , जंगलाच्या आसर्यानं वाढणाऱ्या बेरड जमातीची अस्सल कथा. कथाकार म्हणून साहित्यिक कारकीर्द सुरु करणाऱ्या श्री. रणजीत देसईंची हि पहिलीच कादंबरी. कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार मुलतःच भिन्न प्रकृतीधर्माचे आहेत. त्यामुळं या दोन्ही साहित्यप्रकारांवर प्रभुत्व असलेले सव्यसाची ललितलेखक हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेच आढळतात. श्री. रणजीत देसाई त्यापैकीच एक. आपल्या दृढ परिचयाचा भौगोलिक भाग त्यांनी या कादंबारीकता निवडला आहे. कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याच्या वाटेवर सुतगट्टी या नावाचं गाव लागतं. तिथून काकती गावापर्यंतची पंधरावीस मैलांची, अगदी दाट गहिऱ्या जंगलान वेढलेली वाट `सूतगट्टीची बारी` म्हणून ओळखली जाते. भर दुपारी अंधारून याव, असा हा भाग. त्या बरीचीची, त्या जंगलाच्या आसऱ्यान वाढणाऱ्या बेरड जमातीची हि कथा. श्री. रणजीत देसईंचा रहिवास जन्मापासूनच खेड्यात झालेला आहे. आजही रात्रंदिवस ते याच लोकांत वावरत आहेत. तिथल्या मातीतच त्यांची कला मूळ धरीत आहे. त्यामूळं हि कादंबरी म्हणजे सुरेख शहरी कुंडीत लावलेलं खेडेगावातल फुलझाड नाही. प्रसंगाचा, निसर्गाचा, भावविश्वाचा, भाषाशैलीचा आणि या जीवनावर जिची च्या पडली आहे, त्या समस्येचा अस्सलपणा या कादंबरीत अधिक प्रमाणात आहे. या ग्रामीण जीवनात जी सामाजिक, आर्थिक, राजकीय, यांत्रिक, शैक्षणिक अशी सर्वंकष स्थित्यंतरे होत आहेत, ती सारी कधी विकत हास्य करीत, तर कधी कारुण्यान काजळून जात लेखकापूढ प्रकट होत आहेत. या जीवनाविषयी त्याला आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, पोटतिडीक आहे. या जीवनाचाच एक लहानसा भाग असलेल, बेरड जमातीचं परंपरागत जीवन, त्या जीवनात होऊ घातलेली स्थित्यंतरे आणि त्या जमातीच्या भाविताव्याविशयीची काळजी या सर्वांतून `बारी` स्फुरली आहे, फुलली आहे. 21 cm Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 [891.46371 DES] (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha