Logo
Knowledge Resource Center/Library

Your search returned 81 results.

Not what you expected? Check for suggestions
61. BOOKS
कॅम्पस टू कोर्पोरेट: रोजगारक्षमता वृद्धीचा मार्ग by जोशी, गंगाधर Publication: Los Angelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 252 p. : , गंगाधर जोशी कॅम्पस टू कॉर्पोरेट या पुस्तकातून ज्ञानाचे कौशल्यात रूपांतर करणे आणि त्यातून रोजगार निर्माण करणे, या गोष्टींवर नवा प्रकाशझोत टाकतात. आजच्या काळात, शिक्षण पूर्ण झालेले विद्यार्थी आणि कौशल्यांच्या आधारावर नोकरी देणाऱ्या कंपन्या या दोन्हींमधील अंतर हा कदाचित सर्वांत मोठा असा भाग आहे, ज्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या पुस्तकामध्ये वैश्विक रोजगारक्षमतेवर लक्ष केंद्रित केलेले आहे. रोजगारक्षमतेविषयीच्या समस्या इथे एकत्रितपणे समजून घेतलेल्या आहेत आणि निरंतर रोजगारक्षमता प्राप्त करण्यासाठी कौशल्ये संपादन करण्याकडे लक्ष केंद्रित करणारी व्यावहारिक पद्धत यामध्ये आहे. व्यक्तिगत कौशल्यांपासून सुरुवात करून नंतर संघटनात्मक कौशल्ये आणि अखेरीस तंत्रज्ञानाविषयीची कौशल्ये, अशी प्रगतीकारक कौशल्ये आत्मसात करण्याचा एक कार्यक्रम, हे पुस्तक सादर करते. प्रमाणपत्रे आणि व्यावसायिक संबंध या विषयांवरची प्रकरणे विशेष वेगळी आहेत, ती यासाठी की, त्यामध्ये कामकाज, वित्त आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) यासारख्या अनेक क्षेत्रांची दखल घेतली आहे. 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

62. BOOKS
संशोधन प्रकल्प कसा करावा : याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन by O'Leary, Zina Publication: New delhi : SAGE Publications India Pvt. Ltd, 2018 . 392 p. : , ‘संशोधन प्रकल्प कसा करावा याबाबतचे आवश्यक मार्गदर्शन’ हे पुस्तक संशोधनाच्या नियोजनापासून कार्यवाहीपर्यंत सर्व टप्प्यांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरेल. त्यातून विद्यार्थ्यांना प्रत्येक टप्प्याचे नेमके आकलन होईल. संशोधनाचे नियोजन, डेटा संकलन, विश्लेषण या महत्त्वाच्या आघाड्यांवर त्यांच्या ज्ञानात भरच पडेल. सर्वोत्तम पद्धतींवर भर देऊन प्रत्यक्ष संशोधनादरम्यान अनेक व्यवहार्य सल्ले आणि सूचना वाचकाला मिळत राहतात. ‘अनभिज्ञ ते तज्ज्ञ’ या प्रवासासाठी आवश्यक ज्ञान आणि कौशल्ये हे पुस्तक पुरवते. प्रकल्प सुरू करण्यापासून तो लिहून काढेपर्यंत प्रत्येक टप्प्यासाठी प्रकरण सर्व शंकांचे निरसन करते. या पुस्तकाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. जसे, वर्कशीट्स प्रत्यक्ष प्रकल्पांची उदाहरणे मासिकांतील लेख पत्रिका लेख महत्त्वपूर्ण पारिभाषिक व्याख्या प्रकरण सारांश अधिक वाचनासाठी शिफारशी, शब्दसंग्रह इत्यादी. लेखिका झिना ओ’लिअरी व्यावहारिक उदाहरणांबरोबरच केस स्टडीजही पुरवतात. संशोधन प्रकल्प पूर्ण करू इच्छिणाऱ्या कोणीही विचारलेल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे देतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे असायलाच हवे असे पाठ्यपुस्तक. 25 cm Date: 2018 Availability: No items available: In transit (1),

63. BOOKS
प्रचीन भारताचा समग्र इतिहास by शेंडे, सो. रा. Publication: Los Angelis : SAGE Publications India Pvt. Ltd., २०१८ . 229 p.: 21 cm Date: २०१८ Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

64. BOOKS
संशोधन प्रस्ताव विकसित करणे by डेनिकोलो, पॅम Publication: Los Angelis: SAGE Publications India Pvt. Ltd, 2018 . 160 p. : , ‘संशोधन प्रस्ताव विकसित करणे’ हे पुस्तक काही मूलभूत प्रश्नांची उकल करते. उदा. संशोधन प्रस्ताव विकसित करण्यासाठी नेमके काय करावे? सर्वोत्तम असा यशस्वी संशोधन प्रस्ताव कसा विकसित करावा? उपलब्ध साहित्याचे परीक्षण कसे करावे? पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्यासाठी संशोधन प्रस्ताव लिहिणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. या सहजसोप्या, माहितीपर आणि रंजक पुस्तकाद्वारे डेनिकोलो आणि बेकर तुम्हाला परिणामकारक संशोधन प्रस्ताव बनवण्याविषयी मार्गदर्शन करतात, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रकल्पासाठी आर्थिक साह्य मिळू शकेल किंवा एखाद्या संशोधन पदवी अभ्यासक्रमात तुम्हाला स्थान मिळू शकेल. तुमचा संशोधन प्रस्ताव वाचणाऱ्यांना तुमच्याकडून काय अपेक्षित आहे, हे जाणून घेणे सुलभ होईल. याशिवाय प्रत्यक्ष कार्यानुभव देऊन तुमच्या लिखाणातील कौशल्य उंचावण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. तंत्रजड भाषा टाळण्याचा उद्देश ठेवून हे लिहिले गेले आहे आणि विद्यार्थ्यांना जितके माहीत असायला हवे, त्याचीच चर्चा करण्यात आली आहे. 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

65. BOOKS
भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास : भारतीय समाजशास्त्र : समस्या आणि आव्हाने by थारा भाई, एल. Publication: Los Anjelis: Sage bhasha publication, 2017 . 312 p. : , संपूर्ण भारताला एक समाज म्हणून विचारात घेण्याची पारपंरिक वृत्ती आणि भारताकडे एक राष्ट्र-राज्य म्हणून पाहण्याचा नैसर्गिक कल याविषयीची तपासणी भारतीय समाजशास्त्रज्ञांमार्फत होऊ लागली आहे.‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ हा बहुप्रबंधक खंड या परिणामांचाच एक भाग ठरतो. ‘भारतीय समाजशास्त्राचा अभ्यास’ या खंडात आलेले निबंध हे एकेकट्याने किंवा सामूहिक स्वरूपात भारतीय समाजाच्या व समाजशास्त्र अभ्यासाच्या एक किंवा अनेक पैलूंचे विश्लेषण करतात. त्या दृष्टीने हा खंड म्हणजे खरोखरीच भारतीय समाजशास्त्राविषयीचा शोधकदीप ठरतो. तसेच, भारतीय समाजशास्त्रज्ञांना आत्मनिरीक्षणासाठी प्रवृत्त करतो. भारतीय समाजशास्त्र संस्थेच्या (आयएसएस) अधिकृत मुखपत्रातून प्रस्तुत निबंधांची काळजीपूर्वक निवड प्रा. एल. थारा भाई यांनी केली आहे. समाजशास्त्र प्रगल्भ झाल्यानंतर आणि भारतात लोकप्रिय झाल्यानंतर विद्यापीठे, महाविद्यालये, शाळा अशा विविध स्तरांवर या विद्याशाखेचा विस्तार झाला. इतर विद्याशाखांनाही समाजशास्त्राची दखल घ्यावी लागते. दुसरीकडे, आधुनिकतेची तीव्र लाट आणि जागतिकीकरणाचा रेटा यांनी या विद्याशाखेसमोर नवे आव्हान उभे केले. त्यांची दखल आधुनिक समाजशास्त्रानेही घेतलेली दिसून येत आहे. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

66. BOOKS
मागोवा अर्थविचारांचा by मुसमाडे, मंजुषा Publication: Sage bhasha Publishers 2018 Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

67. BOOKS
भारतीय अर्थव्यवस्था : स्थूल अर्थशास्त्रीय आढावा by बानीक, नीलांजन Publication: Los Angelis : Sage bhasha Publishers, 2017 . 288 p. : , नीलांजन बानीक लिखित ‘भारतीय अर्थव्यवस्था’ हे पुस्तक भारतीय स्थूल अर्थव्यवस्थेचा थोडक्यात परंतु सुबोध आढावा घेते. आर्थिक वृद्धी आणि स्थैर्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेली सरकारी धोरणे आणि उपायांची समीक्षा करते. भारतीय संदर्भांचा आधार घेत सविस्तर केस स्टडीज, आकृत्या आणि कोष्टके, उदाहरणे यांच्या साह्याने हे पुस्तक आर्थिक सिद्धान्तांची वास्तव अर्थव्यवस्थेशी सांगड घालते. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये अर्थव्यवस्थेची भूमिका ही वेगळी आहे आणि म्हणूनची ती स्वतंत्रपणे समजावून घ्यावी लागते. आजवर स्थूल अर्थशास्त्रावरील पाठ्यपुस्तकांचा भर प्रामुख्याने पश्चिम युरोप आणि दक्षिण अमेरिकेतील अर्थव्यवस्थांवर होता. भारतीय संदर्भाचे भारतीय विद्यार्थ्यांसाठीचे पाठ्यपुस्तक जवळपास नव्हतेच. ती उणीव बानीक यांच्या पुस्तकाने भरून काढली आहे. विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन या पुस्तकाचे लेखन केले गेले आहे. भारतीय स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना समजून घेण्यासाठी ते आदर्शवत आहे. पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी, त्याचबरोबर धोरणकर्त्यांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरू शकेल. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

68. BOOKS
भारतीय प्रशासन : उत्क्रांती आणि व्यवहार by चक्रवर्ती, बिद्युत Publication: Los Anjelis : Sage bhasha Publishers, 2018 . x, 352 p. : , विविध सैद्धान्तिक आणि व्यावहारिक बाबींचे संदर्भासहित विश्लेषण करून हे पुस्तक वाचकांना भारतीय प्रशासनाच्या उत्क्रांतीचा परिचय करून देते. भारतीय प्रशासन : उत्क्रांती आणि व्यवहार स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारतीय लोकप्रशासनाच्या वृद्धी आणि विकासाचा परामर्श या क्षेत्रातील नवीन मुद्दे आणि आव्हानांचे सखोल विश्लेषण करते. केवळ भारतीय प्रशासन व्यवस्थेतील संस्थात्मक वैशिष्ट्यांवर भर न देता, हे पुस्तक महत्त्वाच्या मुद्द्यांचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून वेध घेते. त्यामुळे वाचकांना अभ्यास आणि व्यवहाराच्या क्षेत्रातील वैचारिक आणि सैद्धान्तिक व्यामिश्रता जाणून घेण्यास मदत होईल. ठळक वैशिष्ट्ये भारतीय प्रशासनातील पारंपरिक आणि नवीन मुद्द्यांचा सखोल आणि बहुआयामी पद्धतीने परामर्श घेते प्रशासनातील प्रक्रियांचा संबंधित घटनात्मक तरतुदी तसेच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय संदर्भांसह मागोवा घेते भारतीय प्रशासकीय व्यवस्थेतील नवीन आव्हाने आणि आगामी मुद्द्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती पुरवते भारतीय विद्यापीठांतील विद्यार्थी आणि राज्य व केंद्रीय मुलकी सेवा इच्छुकांसाठी उपयुक्त अभ्यास 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

69. BOOKS
संशोधन पद्धती: नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक by कुमार, रणजीत Publication: Los Angelis : SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 468 p. : , सामाजिक शास्त्रांमधील पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांनी संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन प्रकल्पांवर काम करण्यास सिद्ध होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पुस्तक आहे, रणजित कुमार लिखित ‘संशोधन पद्धती: नवोदितांकरिता क्रमवार मार्गदर्शक’! संशोधन किंवा संशोधन पद्धतीचा कोणताही अनुभव नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक खास लिहिले गेले आहे. सामाजिक शास्त्र विषयातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी, ज्यांना संशोधनात रस आहे, त्यांना हे पुस्तक तंत्रे आणि उदाहरणे यशस्वीरित्या पुरवते. या नवीन आवृत्तीमध्ये संख्यात्मक आणि गुणात्मक संशोधन पद्धतींमधील तफावत कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या दोन्ही पद्धतींमधील शंकानिरसन आठ पायऱ्यांमध्ये करण्यात आले आहे. प्रचलित संख्यात्मक संशोधन पद्धतीच्या सर्वंकष अभ्यासाबरोबरच या सुधारित आवृत्तीमध्ये गुणात्मक संशोधन पद्धतीच्या सविस्तर अभ्यासाचा समावेश करण्यात आलेला आहे. सर्वच प्रकरणांमध्ये प्रतिसादात्मक प्रश्न या पूर्णपणे नूतन अभ्यासतंत्राचा अंतर्भाव करण्यात आला आहे. संशोधनासारखा गंभीर विषय लेखकाने सुगम आणि सुलभ पद्धतीने मांडला आहे. 25 cm. Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

70. BOOKS
भारताची राज्यघटना, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी हक्क by Mellalli, Praveenkumar, Publication: Los Angelis: Sage publishers, 2017 . xxii, 211, 9, 2, 36, 3, 3 pages : , भारताची राज्यघटना, व्यावसायिक नीतिमूल्ये आणि मानवी हक्क हे पुस्तक भारतीय राज्यघटना, मानवी हक्कांशी संबंधित मूलभूत बाबी आणि व्यावसायिक नीतिमूल्यांचे आचरण यांचा सर्वंकष आढावा घेते. हे पाठ्यपुस्तक विविध विषयांचे आकलन सहजसुलभ प्रकारे करून देते. त्याचबरोबर, राज्यघटनेवरील एखाद्या अभ्यासक्रमाचे उद्दिष्ट परिणामकारक आणि योग्यरीत्या गाठण्यातही ते यशस्वी ठरते. या पुस्तकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. उदा. ताज्या घडामोडींवर आधारित विषय, आकलन आणि स्मरणाला पूरक अशी प्रकरणांची तर्कशुद्ध क्रमवारी, विषय समजावून देण्यासाठी आवश्यक अशी आकृत्या व सारणींची सरळसोपी मांडणी. विविध स्पर्धा परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण होण्यासाठी आणि हा विषय मुळापासून समजून घेण्यासाठी या पुस्तकाची मदत होऊ शकेल. या विषयाची काही उद्दिष्टे आहेत. जी साध्य करण्याच्या दृष्टीनेही लेखक प्रवीणकुमार मेल्लल्ली यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. मुलकी सेवेचे इच्छुक विद्यार्थी, अभियांत्रिकीचे विद्यार्थी असा विविध विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरू शकेल. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

71. BOOKS
केशराचा मळा: ना. सी. फडके लिखित साहित्याचा मागोवा by फडके, ना. सी. Publication: Los Angelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 180 p. : , ना.सी.फडके लिखित साहित्याचा मागोवा.जुन्या पिढीतील वाचकांना ‘नासीं’च्या आठवणींना उजाळा मिळावा मिळावा आणि नव्या पिढीला ‘नासीं’च्या लेखनपैलूंची ओळख व्हावी याकरिता हे आम्हा सर्वांचे ‘केशरफुल’ 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

72. BOOKS
भारतातील दलित समाज: सामूहिक विधिलिखिताच्या शोधात by थोरात, सुखदेव Publication: Los Anjelis : Sage bhasha publication, 2017 . xxi, 350 p.: , ‘भारतातील दलित समाज’ हे सुखदेव थोरात लिखित पुस्तक भारतातील दलितांची सद्यस्थिती मांडण्याबरोबरच त्यांच्या परिस्थितीतील बदलांचा आढावा घेते आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजनाही सुचवते. दलितांचे सध्याचे देशातील स्थान आणि राज्यागणिक स्थान यांचा सविस्तर आढावा हे पुस्तक घेते. यासाठी मानवी विकास, सामाजिक आणि आर्थिक अशा विविध निर्देशांकांचा आधार घेते. मुख्य प्रवाहापासून दूर ठेवण्यासाठी दलितांबरोबर कशा प्रकारे भेदभाव केला जातो याचाही सप्रमाण आणि सोदाहरण विवेचन या पुस्तकात मांडण्यात आले आहे. अशा प्रकारे दलितांचा सर्वांगीण अभ्यास देशात कदाचित पहिल्यांदाच झाला असेल. सामाजिक, सांस्कृतिक उत्थानाबरोबरच आर्थिक प्रगतीही महत्त्वाची असते आणि त्यातूनच राजकीय उत्कर्ष संभवतो हा संदेश या पुस्तकातून मिळत राहतो. संशोधक, विद्यार्थी, राजकारणी, समाजसेवक, गरिबी आणि सामाजिक दुर्लक्ष या क्षेत्राशी संबंधित अभ्यासक अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरू शकते. 21 cm. Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

73. BOOKS
सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा by शर्मा, सिद्धार्थ Publication: Los angelis: SAGE Publications India Pvt. Ltd., 2018 . 328 p. : , अनेकजण स्वप्न पाहतात, पण त्यातले मोजकेच लोक ते पुरे करण्यासाठी धडपडतात आणि आयुष्यभर त्याचा ध्यास घेतात. काही लोक आयुष्यात मोठमोठी स्वप्ने जरूर पाहतात, पण दुर्दैवाने आळशीपणा, निष्क्रियता, भीती, अपयश किंवा इतरांच्या दबावापायी ते आपली स्वप्ने जगायचे थांबवतात. ‘सोमवारवर प्रेम करा आणि तरुणपणी निवृत्त व्हा’ हे पुस्तक पुरवते अत्यंत परिणामकारक आणि अत्याधुनिक स्ट्रॅटेजीज्, अशा व्यक्तींसाठी ज्यांना ध्यासातूनच जीवन साकारायचे आहे आणि मनासारखे जगून पैसे कमवायचे आहेत! अमाप संपत्ती आणि काठोकाठ भावनिक समाधान ही दोन्ही ध्येये वेगाने गाठायची असतील तर त्यासाठी “उत्कट ध्यासा”चा मार्ग धरावाच लागेल. आपल्या व्यावसायिक जीवनाचे व्यवस्थापन आपण कसे करावे, आर्थिक स्वातंत्र्य कसे प्राप्त करावे आणि एक परिपूर्ण आयुष्य कसे जगावे, याचा खोलवर विचार देणारे असे हे पुस्तक आहे. कामाच्या वर्तमान परिस्थितीचा आणि आयुष्य बदलून टाकण्याची क्षमता असलेला असा हा वेध असून त्याचा लाभ सर्व वाचकांना निश्चितच मिळेल. 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

74. BOOKS
भारतातील सामाजिक चळवळी : एक साहित्यीक परामर्श by शाह, घनश्याम Publication: Los Anjelis : Sage bhasha Publishers, 2017 . 288 p. : , ‘भारतातील सामाजिक चळवळी’ या विचारप्रवर्तक अशा पुस्तकाची ही संशोधित आणि सुधारित आवृत्ती आहे. या पुस्तकात शेतकरी, आदिवासी, दलित, मागासवर्गीय, महिला, विद्यार्थी, मध्यमवर्गीय, कामगार, मानवाधिकार आणि पर्यावरण अशा नऊ विषयांशी संबंधित चळवळींचा साक्षेपी आढावा घेण्यात आला आहे. सामाजिक चळवळी सहसा असंघटित असल्या, तरी काहीतरी सामूहिक राजकीय भूमिका घेऊन राजकीय आणि/किंवा सामाजिक बदलांसाठी सतत प्रयत्नशील असतात. भारतात अशा चळवळींची परंपरा कित्येक शतकांची असली, तरी त्यांचा सखोल अभ्यास अलीकडेच सुरू झालेला दिसतो. भारतात १८५७पासून सुरू झालेल्या सामाजिक चळवळींशी संबंधित साहित्याची समीक्षा आणि विश्लेषण हे पुस्तक करते. आधुनिक भारतातील सामाजिक चळवळींची तर्कशुद्ध वर्गवारी करण्याच्या उद्देशाने घनश्याम शाह यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे कौतुक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय अभ्यासक, इतिहासतज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञांनी केले आहे. सामाजिक चळवळींविषयी असणाऱ्या अभ्यासक्रमांमध्येही हे पुस्तक एक पाठ्यपुस्तक म्हणून उपयुक्त ठरते. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

75. BOOKS
गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती: विद्यार्थ्यांना संशोधन-प्रक्रियेत गुंतवणे by हेस-बिबर, शार्लीन नॅगी Publication: Los Angelis : SAGE Publications India Pvt. Ltd., 2017 . 376 p. : , गुणात्मक संशोधनाची कार्यपद्धती या पुस्तकाच्या ३ऱ्या आवृत्तीचा उद्देश तोच आहे... विद्यार्थी आणि शिक्षकांना संशोधनासाठी गुणात्मक पद्धतींचे वापरात असलेले नमुने उपलब्ध करून देणे. या विषयाच्या इतर पुस्तकात आणि यात फरक हा आहे की हे पुस्तक खास प्रश्नाला कुठल्याही पद्धतीशी जोडून, केंद्रस्थानी ठेवते. संशोधनाचा विशेष प्रश्न आणि त्याचे उत्तर देण्यासाठी निवडलेली पद्धत किंवा पद्धतींचा संच यांच्यामध्ये ‘घट्ट दुवा’ असण्यावर यात जोर दिला आहे. संशोधन अभ्यास, उतारे, वैयक्तिक अनुभवाचे दाखले यांचा अंतर्भाव केल्यामुळे प्रत्येक प्रकरणात सुसंगत आणि रोचक उदाहरणे आढळतात. गुणात्मक कार्यपद्धती अभ्यासण्यासाठी विद्यार्थ्यांना हे पुस्तक वाचावेच लागेल. विद्यार्थ्यांना खरोखरच ते स्वतःहून वाचायला आवडेल. कारण उदाहरणांच्या माध्यमातून विषय समजावून घेणे त्यांना अधिक सोपे जाईल. गुणात्मक संशोधनाच्या प्रत्येक पैलूचा आढावा हे पुस्तक अतिशय प्रवाही भाषेतून घेते. बहुतेक संशोधकांना प्रत्यक्ष फील्डवर ज्या अडचणी आणि आव्हानांचा सामना करावा लागतो, त्यांविषयी उपयुक्त माहिती पुस्तकात आहे. 25 cm Date: 2017 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

76. BOOKS
विकासाचे अर्थशास्त्र: सर्व समावेशक वृद्धीच्या दिशेने by नक्वी, सय्यद नवाब हैदर Publication: Los Angelis: Sage Publishers, 2018 . 292 p. : , हे नवीन पाठ्यपुस्तक विकास आणि समावेशक वृद्धीच्या मूलतत्त्वांची चिकित्सक दृष्टिकोनातून चर्चा करते. त्याचबरोबर विकास, वृद्धी, समता, गरिबी यांच्यातील तरल संबंधांवषयी वेगळी भूमिका मांडते. विकासाचे अर्थशास्त्र : सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने हे पुस्तक अशी भूमिका मांडते, की वृद्धी, उत्पन्नाचे वितरण आणि गरिबी निर्मूलनावर स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याऐवजी विकास धोरणांचे मूलभूत उद्दिष्ट सर्वसमावेशक वृद्धी हे असले पाहिजे. विकासाच्या मुद्द्यांकडे हे पुस्तक तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहते, तसेच विकसनशील देशांनी राबवलेल्या यशस्वी आणि अयशस्वी धोरणांचा धांडोळा घेऊन त्यांचे विश्लेषण करते. हे पुस्तक अनेक दशकांतील संशोधनाचा आणि धोरण निश्चिती व अंमलबजावणीतील अनेक वर्षांच्या अनुभवाचा परिपाक आहे. विकसनशील देशांच्या विकासाची मांडणी करण्यासाठी लेखक विकास क्रांतीचे मूळ आणि प्रगती, उदारमतवादी प्रारूप आणि मानवी विकासाच्या माध्यमातून सर्वसमावेशक वृद्धी यांचा लेखाजोखा सादर करतो. 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

77. BOOKS
पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धांत आणि उपयोजन by सिंह, कटार. Publication: Los angelis: Sage bhasha publishers, 2018 . 408 p. : , पर्यावरणीय अर्थशास्त्र : सिद्धान्त आणि उपयोजन म्हणजे पर्यावरणीय अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास असून; सामूहिक कृती, पर्यावरण धोरण आणि व्यवस्थापनाविषयी सिद्धान्तांवर यात विशेष भर आहे. सिद्धान्त आणि सराव यांचा समतोल मेळ असलेल्या या पुस्तकात पर्यावरणीय अर्थशास्त्रातील अनेक मूलभूत संकल्पना, साधने, तंत्रे यांची ओळख करून देण्यात आली आहे. त्यांच्या आधारे वाचकाला पर्यावरण समस्यांच्या मुळाशी जाऊन त्यांचे व्यवहार्य निराकरण करता येईलच, शिवाय धोरण आणि व्यवस्थापन यांची आखणीही करता येईल. या पुस्तकाची इतर काही वैशिष्ट्ये आहेत. उदा. संकल्पना, विषय आणि सिद्धान्त यांचे नावीन्यपूर्ण संश्लेषण; सोप्या, सहज भाषेत आणि शैलीत मांडणी; प्रत्यक्ष जीवनातील प्रसंगांवर आधारित स्पष्टीकरणे आणि उदाहरणे. जागतिक तापमानवाढ, ओझोन थराचा ऱ्हास, आम्लाचा पाऊस आदी पर्यावरणीय समस्यांविषयी ताजी माहिती यात समाविष्ट आहे. 25 cm. Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

78.
जागतिकीकरणात लोकप्रशासन : सिद्धांत आणि व्यवहार by चक्रवर्ती, बिद्युत Publication: Los Angelis : Sage bhasha Publishers, 2018 . xxx, 509 p.: , जागतिकीकरणाच्या आजच्या युगात लोकप्रशासनाच्या क्षेत्रात होत असलेल्या घडामोडींचा सारांशात्मक आढावा ‘जागतिकीकरणातील लोकप्रशासन’ हे पुस्तक घेते. शासन पद्धती समजून घेण्यासाठी आवश्यक महत्त्वाच्या पैलूंचा घेतलेला मागोवा हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. हे करत असतानाच, जगभरात एकूणच समाज आणि प्रशासन प्रणालींमध्ये होत असलेल्या संक्रमणाची दखलही हे पुस्तक घेते. यात पुढील काही विषयांचा अभ्यास आहेः • लोकप्रशासन या विषयाची उत्क्रांती • प्रशासन सिद्धान्त • लोकप्रशासनातील ताज्या घडामोडी • लोकनीती • विकास प्रशासन • विकेंद्रीकरण आणि स्थानिक प्रशासन • समाजकल्याण आणि प्रशासन • भारतातील लोकप्रशासन • नागरिक आणि प्रशासन • भारतीय अर्थसंकल्प आणि वित्तीय प्रशासन • भारतातील प्रशासकीय सुधारणा • जागतिकीकरण आणि लोकप्रशासन पाठ्यपुस्तकाच्या शैलीत लिहिले गेलेले हे पुस्तक, प्रत्येक प्रकरणाशी संबंधित प्रश्नसंचांमुळे, या विषयाच्या पदवीपूर्व आणि पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल. याशिवाय विविध मुलकी सेवा परीक्षार्थी आणि यूजीसी-नेट परीक्षार्थींनाही त्याचा लाभ होईल. 25 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

79. BOOKS
देहबोली: व्यावसायिकांना मार्गदर्शन by लेविस, हेडविग Publication: Los angelis: SAGE Publications India Pvt. Ltd. 2018 . 292 p.: , सध्याच्या स्पर्धेच्या युगात देहबोलीवरील नियंत्रण हे एक अत्यावश्यक कौशल्य बनले आहे. अधिकारी वर्ग, मनोरंजन व्यावसायिक, राजकारणी, सेलेब्रिटी यांना यशोशिखरावर नेते ती त्यांची देहबोलीच! आजच्या युगात देहबोली हा तसा अगदी परिचित शब्द आहे. स्वतंत्र व्यावसायिक, नाटक आणि चित्रपट कलावंत, मैदानांवर कामगिरी करणारे खेळाडू, राजकारणी व्यक्ती, टीव्ही कार्यक्रमांचे सूत्रधार, रँपवर चालणाऱ्या मॉडेल्स, व्याख्याते, सादरकर्ते या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग म्हणजे देहबोली. हेडविग लेविस यांचे ‘देहबोली’ हे पुस्तक त्या बहुचर्चित देहबोलीचे रहस्य उलगडून दाखवते. दहा वर्षांपूर्वी या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली, त्यावेळी तिला तडाखेबंद प्रतिसाद मिळाला होता. दरम्यानच्या काळात इंटरनेट आणि विविध माध्यमांच्या उगमानंतर देहबोलीच्या संकल्पनेतही नव्याने कुतूहल निर्माण झाले आहे. व्यवस्थापनशास्त्र, मनुष्यबळ विकास यांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांनीही देहबोलीच्या अभ्यासाचा आणि सरावाचा अंतर्भाव व्यावहारिक कौशल्ये या विषयाअंतर्गत केलेला आहे. त्या दृष्टीनेही हे पुस्तक महत्त्वाचे ठरले आहे. 23 cm Date: 2018 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

80. BOOKS
ओलावा by साठ्ये, श्रीराम विष्णू Publication: Los Anjelis : SAGE Publications India Pvt. Ltd., 2015 . 79 p. : , ओवा हे पुस्तक लिहिताना यातील सर्वच गोष्टी निसर्गाची विविधता, सौंदर्य, उदारता हि झाडे, फुले, पाने, वृक्षवेली यांच्या माध्यमातून माणूस आणि निसर्ग यांच्यात कुठेतरी प्रेमाचा धागा सामायिक आहे व त्या धाग्यात सर्व सृष्टी गुंफलेली आहे असे मनाला भासत राहिले. मानवाप्रमाणे पण-फुलांना, वृक्षवेलींना भावना असल्यासच पाहिजेत परंतु त्यांना त्या व्यक्त करता येत नसाव्यात किंवा त्या भावना आपणास समजून घेत नसाव्यात असे वाटते. अशा नाजूक व पर्यावरणासंबंधित व त्यांची जाणीव करून देणाऱ्या घटना या पुस्तकात आहेत. हि जाणीव असणारी अशी एक व्यक्ती माझ्या आयुष्यात आली. त्या जाणिवेपोटी त्या व्यक्तीने अशी काही मदत केली कि ती मदत आज मला माझी आवश्यकता होऊन राहिली आहे. 21 cm Date: 2015 Availability: Items available: AEF's Arihant college of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 (1),

AEF's, Arihant College of Arts, Commerce and Science, Camp, Pune-01 . All Rights Reserved.
Implemented by Sheetal Ankushe

Powered by Koha